बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लस न घेण्याचा निर्णय आला ‘या’ अभिनेत्रीच्या अंगलट, वाचा सविस्तर

मुंबई | बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बेदी हिला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना लसीकरण जेव्हा सुरु करण्यात आलं होतं, त्यावेळी पूजाने कोरोना लसीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर तिने कोरोना लस न घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय आता तिच्या अंगलट आला आहे.

पूजा बेदीने कोरोना लस न घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तिला नुकतीच कोरोनाची लागण झाल्याने त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर पूजाच्या प्रियकराला आणि मोलकरणीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत एक व्हिडीओ पूजाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये सु्द्धा तिने, कोरोना झाला तरी लस घेणार नसल्याचं म्हटलं आहे. कोरोना घरगुती उपचाराने बरा होतो, त्यामुळे घाबरण्याचं कारण नसल्याचं देखील तिने म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये रविवारी कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अशातच या अभिनेत्रीला कोरोनाची लागण झाल्याने सध्या ती प्रचंड चर्चेत आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमधून कोरोनाचा संसर्ग झाल्यावर काय खावं, कशी काळजी घ्यावी, हे देखील पूजाने सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी राज ठाकरे अयोध्येला जाणार, कांचन गिरीजींनी घेतली भेट

आमच्या धर्माचा अपमान होत आहे म्हणत तरूणीला जबरदस्तीने काढायला लावला बुरखा… पाहा व्हिडीओ

“चोरांना आणि त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल”

…अन् क्षणात भलं मोठं घर कोसळलं, पाहा केरळमधील थरारक व्हिडीओ

भाजपला मोठा धक्का; ‘या’ दोन मोठ्या नेत्यांचा पक्षाला रामराम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More