Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यातील ‘या’ तरुणीने तब्बल 16 तरुणांना अडकवलं आपल्या जाळ्यात; 15 लाखांहून अधिक किंमतीचा लुटला ऐवज

पुणे | पुण्यातील एका 27 वर्षीय तरुणीने एक दोन नव्हे तर तब्बल 16 तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सायली काळे असं या आरोपी तरूणीचं नाव असून ती पुण्यातील साधु वासवाणी रोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीत राहत होती. सायलीने डेटींग अ‍ॅपद्वारे तिने तब्बल 16 तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत त्यांच्याकडील सोनं लंपास केलं. ज्यामध्ये सोन्याच्या चैन, अंगठ्या आणि महागड्या मोबाईलचा समावेश होता. सुमारे 15 लाखांहून अधिक किंमतीचा हा ऐवज होता.

लुटल्या गेलेल्या एका तरुणाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेतली आणि हा प्रकार उघडकीस आला. तरुणाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणीला पकडण्यासाठी स्मार्ट गेम खेळला आणि ती त्यांच्या जाळ्यात अडकली.

पोलिसांनी तिने लुटलेला सर्व ऐवज जप्त केला आहे. त्याचबरोबर सायलीने ज्या 16 तरुणांना फसवलं त्यापैकी फक्त 4 जणांनीच तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. इतर तरुण बेअब्रू होतील या भीतीने अद्यापही पोलिसांकडे तक्रार द्यायला गेले नाहीत.

थोडक्यात बातम्या-

“मी माझी सत्याची बाजू मांडली मात्र तरीही मला धमक्यांचे फोन येतात”

“आम्ही शेतकरी आहोत, गरज पडली तर लाथ मारु तेथे पाणी काढू”

“शरजील उस्मानी ठाकरे सरकारचा जावई आहे का?”

‘उद्या सकाळी शेतात या’, असं व्हॉट्सअ्ॅप स्टेटस ठेवत शेतकऱ्यानी केली आत्महत्या

पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीजवळील गाजलेल्या ‘त्या’ खूनप्रकरणातील कुख्यात गजानन मारणेची निर्दोष मुक्तता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या