एका षटकात ‘या’ खेळाडूने ठोकल्या 28 धावा, चक्क! स्टेडियममधील खुर्चीचं तोडली – पाहा व्हिडीओ
वेलिंग्टन | ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात धमाकेदार कामगिरी केली. वेलिंग्टन येथे झालेल्या सामन्यात त्याने 31 चेंडूत 70 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.
पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवणाऱ्या न्यूझीलंडने तिसऱ्या लढतीत टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय काही योग्य ठरला नाही. आॅस्ट्रेलियाने गोलंदाजांची धुलाई केली आणि 20 षटकात 208 धावा केल्या. आॅस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने सर्वाधिक 70, कर्णधार एराॅन फिंचने 69 तर जोश फिलिपने 43 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाच्या डावात सर्वात स्फोटक फलंदाजी केली ती मॅक्सवेलने, त्याने जेम्स निशमच्या एका ओव्हरमध्ये 28 धावा ठोकल्या. डावातील 17व्या षटकात मॅक्सवेलने 4,6,4,4,4,6 अशा धावा केल्या. मॅक्सवेलच्या या स्फोटक खेळीत त्याने मारलेल्या एका षटकाराने स्टेडियममधील खुर्चीचं तुटली. सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. मॅथ्यू वेड 5 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाने धमाकेदार फलंदाजी केली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या फिंचने 44 चेंडूत 69 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडचा डाव 17.1 षटकात 144 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाने 64 धावांनी विजय मिळवला. 5 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड 2-1ने आघाडीवर आहे.
The last off Maxwell’s five big sixes! #NZvAUS pic.twitter.com/jIgeVr4t91
— cricket.com.au (@cricketcomau) March 3, 2021
Glenn Maxwell’s entered demolition mode in Wellington! #NZvAUS pic.twitter.com/LEWlDFWW6R
— cricket.com.au (@cricketcomau) March 3, 2021
थोडक्यात बातम्या –
बिकनी शूटसाठी अभिनेत्री 2 दिवस उपाशी ‘हे’ आहे कारण
“गुजरातमधील दंगल चुकीची होती हे नरेंद्र मोदींनी मान्य करावं”
ट्विटवर ट्रेंड होतोय ‘अजय देवगन कायर है’? काय आहे किस्सा?
केंद्र सरकारविरोधात बोलणाऱ्या कलाकारांच्या घर आणि कार्यालयांवर इनकम टॅक्सची धाड
सरकारी धोरणांना विरोध करणं म्हणजे देशद्रोह नाही- सर्वोच्च न्यायालय
Comments are closed.