बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छोट्या कियाराचा सोशल मीडियात धुमाकूळ; व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई | नुकताच प्रदर्शित झालेला ‘शेरशाह’ चित्रपट लोकांच्या प्रचंड पसंतीस आला आहे. हा चित्रपट शहीद जवान विक्रम बत्राच्या आयुष्यावर निर्धारीत आहे. या चित्रपटात विक्रम बत्राची भूमिका अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने पार पाडली तर विक्रम यांच्या प्रेयसीची भूमिका अभिनेत्री कियारा आडवाणीने साकारली आहे. यामध्ये तिचे सीन्स लोकांच्या डोळ्यात पाणी आणणारे आहेत.

शेरशाहमधील कियाराच्या लुकने सर्वांना वेड लावलं आहे. अतिशय साधा असलेला हा लूक लोकांना प्रचंड पसंतीस आला. या चित्रपटातील गाणी इन्स्टाग्रामच्या रिल्सवर देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. अशातच एका लहान मुलीने या चित्रपटातील डिंपलचे काही सिन्स रिल्समध्ये रिक्रिएट केले आहे.

विशेष बाब म्हणजे या लहान मुलीने तिचा मेकअप देखील डिंपल सारखा केला असून तिचा अभिनय लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. या मुलीने केलेल्या व्हिडीओने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. तसेच तिच्या व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर अनेक वेळा लहान मुलींच्या अभिनयाचे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही मुली तर इतक्या व्हायरल होतात की त्या रातोरात स्टार बनतात. मात्र या लहान मुलीने लोकांना वेड लावलं आहे. तिचे व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाण व्हायरल होत आहेत.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

रहाटणीतील ‘लेगसी ऑरा’ चा अनोखा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव!

पुण्यात बिग बास्केट कंपनीला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

“मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे”

“उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More