धमाकेदार फीचर्ससह यमाहाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच होणार भारतात लाॅंच

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सध्या पेट्रोल-डिझेलच्या(Petrol-Diesel) दरानं उच्चांक गाठला आहे. त्यामुळं अनेकजण आता इलेक्ट्रिक वाहनांना(Electric Vehicle) पसंती देत आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेता आता गाड्या बनवणाऱ्या कंपन्याही इलेक्ट्रिक गाड्यांचे नवनवीन माॅडेल बाजारात आणत आहेत.

आता यमाहा(Yamaha) कंपनीही लवकरच भारतातत इलेक्ट्रिक स्कूटर(Electric Scooter) लाॅंच करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळं आता यमाहा कंपनी ओला, हिरो यांसारख्या बड्या कंपन्यांना टक्कर देणार आहे.

आता आपण यमाहाच्या नवीन स्कूटरमध्ये काय फिचर्स असतील याची माहिती घेऊ. चालकाच्या सुरक्षतेसाठी स्कूटरच्या पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक तसेच मागच्या चाकावर ड्रम ब्रेक असणार आहेत.

या इलेक्ट्रिक स्कूटकमध्ये डिजिटल डिसप्ले देखील असणार आहे. तसेच या गाडीवर तुम्हाला आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. परंतु ही इलेक्ट्रिक स्कूटर 2025 मध्ये भारतीय बाजारात येण्याची शक्यता आहे.

या ईलेक्ट्रिक स्कूटरवर दोन बॅटरी पॅक मिळू शकतात. ही स्कूटर एकदा चार्ज केल्यावर तुम्ही 70 किमी पर्यंतचा प्रवास आरामात करू शकता.

या स्कूटरची युरोपियन बाजारात अंदाजे 2.58 लाख रूपये आहे. भारतात ही स्कूटर 2.50 लाख रूययांना लाॅंच केली जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या-