अभिनेत्री यामी गौतमला पुत्ररत्न; बाळाच्या युनिक नावाची एकच चर्चा, जाणून घ्या अर्थ

Yami Gautam | ‘विकी डोनर’ या चित्रपटापासून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री यामी गौतमने आपल्या चाहत्यांना मोठी खुशखबर दिली आहे. यामीने 2021 मध्ये फिल्ममेकर आदित्य धरसोबत (Aditya Dhar) विवाह केला. लग्नाच्या तीन वर्षांनंतर यामी आता आई बनली आहे.

याबाबत आदित्य आणि यामी यांनी अधिकृतपणे पोस्ट करत घोषणा केली आहे. यामीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.ही बातमी ऐकून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. आज यामी गौतमने सोशल मीडियावर आपल्या बाळाची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

यामीला अक्षय्य तृतीयाच्या दिनी पुत्ररत्नाचा लाभ झाला. यामीने आपल्या बाळाला युनिक नाव दिलं आहे. त्यामुळे सध्या याचीच चर्चा रंगली आहे. बॉलीवुडमध्ये कलाकार आपल्या लेकरांना काहीतरी भिन्न नाव देण्याचा ट्रेंड फॉलो करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री अनुष्काने देखील मुलाला जन्म दिला. तिने आपल्या मुलाला ‘अकाय’ हे नाव दिलं.

यामीच्या मुलाचे नाव आहे खास

आता यामीने देखील आपल्या गोड बाळासाठी नवीन नाव शोधून काढलं आहे. यामी गौतम आणि आदित्य धर यांनी आपल्या मुलाचे नाव ‘वेदविद’ (Vedavid) ठेवलं आहे. VEDAVID या नावाचा अर्थ वेदांचे ज्ञान असलेला असा होतो. यामीने (Yami Gautam )पोस्ट करत ही गुड न्यूज दिली आहे. या पोस्टनंतर चाहते अभिनंदन करत आहेत. बॉलिवूडमधूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

यामीने 10 मे रोजी अक्षय्य तृतीयाच्या दिनी मुलाला जन्म दिला. तिने पोस्टमधील कॅप्शनमध्ये म्हटलं की, “आम्ही सूर्या हॉस्पिटलच्या शानदार डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. आमच्या जीवनात हा विशेष दिवस शक्य केल्याबद्दल डॉ. भूपेंद्र अवस्थी आणि डॉ. रंजना धनू यांचे विशेष आभार.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditya Dhar (@adityadharfilms)

यामीवर शुभेच्छांचा वर्षाव

पुढे अभिनेत्रीने लिहिलं की, “आता आम्ही पालक बनण्याच्या या सुंदर प्रवासावर आहोत आणि आम्हाला आमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची आशा आहे. आम्हाला आशा आहे की आमचा मुलगा आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी तसेच प्रिय देशासाठी अभिमानाचे प्रतीक बनेल.”

दरम्यान, यामी (Yami Gautam ) आणि आदित्य यांच्यात ‘उरी’ चित्रपटा दरम्यान ओळख झाली होती. याच दरम्यान त्यांच्यात चांगली मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. त्यांनी कोरोना काळ संपल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. आता यामी आणि आदित्य आई-बाबा बनले आहेत.

News Title –  Yami Gautam Blessed with Baby Boy

महत्त्वाच्या बातम्या-

“भाजप गरज संपल्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत..”; शरद पवारांनी दिली धोक्याची घंटा

बारावीच्या निकालाची तारीख ठरली! ‘या’ दिवशी लागणार निकाल

“जिच्यामुळे वाद झाले, तिला तिसराच..”; सलमान-विवेकच्या भांडणावर सलीम खान यांनी सोडलं मौन

MS धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! धोनी अजून एक वर्ष..

एमएस धोनीच्या आयपीएल निवृत्ती संदर्भात मोठी अपडेट; जाणून घ्या धोनी CSK ला कधी निरोप देणार?