बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! ‘फेअर अँड लव्हली’ची जाहिरात करणाऱ्या यामी गौतमला आहे ‘हा’ गंभीर त्वचा रोग!

मुंबई | ‘फेअर अँड लव्हली’च्या जाहिरातीतून प्रचंड प्रसिद्धीस आलेली बाॅलिवूड अभिनेत्री यामी गौतमला ‘केराटोसिस पिलेरिस’ हा त्वचा रोग आहे. याबाबत तिने स्वतः जाहीरपणे इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. फेअर अँड लव्हलीच्या जाहिरातीनंतर यामीने सनम रे, बाला, काबिल, विकी डोनर, अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केली आहेत.

यामी गौतमला ‘केराटोसिस पिलेरिस’ हा त्वचा रोग आहे. या आजारात चेहऱ्यावर छोटे पिंपल्स येतात तसेच त्वचा कोरडी पडते. याबद्दल एक पोस्ट यामीने शेअर केली आहे. यामध्ये तिने केलेल्या एका फोटोशूटमधील काही फोटो आहेत. मला असलेल्या रोगाचा मी अनेक वर्षांपासून सामना करत आहे, मात्र आता मी माझी भीती बाजूला ठेवून उघडपणे याबद्दल सर्वांना सांगत आहे.

हे फोटो पोस्ट प्रोडक्शनसाठी जात होते. जिथं चेहऱ्यावरील आजार म्हणजेच छोटे पुरळ लपवले जातात, डोळ्यांखालील वर्तुळ लपवून कंबर थोडीशी बारीक केली जाते. यावेळी यामी तु सत्य का स्वीकारत नाही?, असा सवाल स्वतःला करुन याबाबत जाहीरपणे बोलण्याचा ठरवलं असल्याचं यामीने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, अनेक युझर्सने या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी तिच्या धाडसेचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी ती जशी आहे तशीच सुंदर दिसते, असं म्हटलं आहे. तर अनेकांनी तु फेअर अँड लव्हली लावली म्हणून असं झालं अशी कमेंट केली आहे.

पाहा पोस्ट आणि कमेंट्सः

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam Dhar (@yamigautam)

 थोडक्यात बातम्या-

‘ही घटना तर जालियनवाला बागची पुनरावृत्ती’; लखीमपूर घटनेवरून शरद पवारांचा हल्लाबोल

शाहरुखच्या मुलाआधी ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्जप्रकरणी झाली होती अटक

“अमरिंदर सिंग भाजपला मदत करतायेत अन्…”, काँग्रेसचा हल्लाबोल

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ नॅच्युरल गॅसच्या किंमतीतही वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

खनिज तेलाची गेल्या 7 वर्षातील उच्चांकी, भारतातील पेट्रोल आणि डिझेलवर मोठा परिणाम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More