Top News अहमदनगर महाराष्ट्र

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

अहमदनगर | यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाली आहे. रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पारनेर तालुक्यातील जतेगाव फाट्याजवळच्या घाटात त्यांच्यावर अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यांना त्यानंतर तातडीने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

रेखा जरे पुण्याहून नगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा, सून, आई होते. यादरम्यान जतेगाव फाट्याजवळ दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली. यातील एकाने जरे यांच्या मानेवर वार केला. अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे.

दरम्यान, रेखा जरे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली याचा तपास पोलीस करत असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘आहो पक्षप्रमुख, खरंच मर्द असाल सांगून टाका…’; नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान

विद्या बालनने डिनरसाठी नकार दिल्याने ‘या’ मंत्र्याने थांबवलं सिनेमाचं चित्रीकरण

…तर जयंत पाटील भाजपमध्ये असते- नारायण राणे

संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये काय चर्चा रंगली?; राऊतांची महत्त्वाची पोस्ट

शेतकऱ्यांना सन्मानानं दिल्लीत येऊ द्या, नाहीतर… बच्चू कडूंचा मोदींना इशारा

कंगणा राणावत पुन्हा अडकली नव्या वादात; ट्रोल होताच काढला पळ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या