Top News महाराष्ट्र मुंबई

शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?

मुंबई | सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं, असं ट्विट महिला व बालकल्याण मंत्री तसेच काँग्रेसच्या कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा रोख राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिशेनं असल्याचं बोललं जातंय.

शरद पवार यांनी लोकमत वृत्तपत्र समुहाला नुकतीच मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधी यांच्यात सातत्याचा अभाव असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

शरद पवार यांच्या याच वक्तव्याचा यशोमती ठाकूर यांना राग आल्याचं दिसतंय. त्यांनी या प्रकरणी थेट महाविकास आघाडी सरकारमधील इतर पक्षांना इशारा दिला आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांनी आघाडी धर्माचं पालन करावं. काँग्रेसचं नेतृत्त्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

 

थोडक्यात बातम्या-

‘एका वर्षात दोनदा सुतक लागणं हे हिंदू शास्त्रानुसार चांगलं नाही’; शिवसेनेचा भाजपला टोला

‘सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर…; या काँग्रेस नेत्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादीला इशारा

“महाविकास आघाडीने भाजपची कबर खोदायला सुरुवात केलीये”

“भाजपला भाजपचेच अहंकारी नेते कसे बुडवतात, हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल”

अमरावतीत भाजप आणि महाविकास आघाडीला धक्का; अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या