मुंबई | गल्लीपासून दिल्लीपर्यंत हनुमान चालीसेवरुन रान उठवणारे खासदार नवनीत राणा आणि रवी राणा हे दाम्पत्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. राणा दाम्पत्याने महाराष्ट्रावरील संकट दूर करण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा संकल्प केला होता. मात्र, शिवसैनिकांच्या विरोधामुळे त्यांची इच्छा फलद्रूप झाली नव्हती.
राणा दाम्पत्याला या प्रकरणामुळेतु तुरूंगातून बाहेर पडल्यानंतरही राणा दाम्पत्याने हनुमान चालीसेचा मुद्दा लावून धरत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणं सुरु ठेवलं आहे. अशात काँग्रेस नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर राणा दाम्पत्यांवर निशाणा साधला आहे.
निवडून यायचं एकाच्या जीवावर अन् दुसऱ्यांची चाकरी करायची, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर केलीये. त्या अमरावतीत बोलत होत्या.
दोन समाजात तेढ निर्माण करून अमरावती शहराचं वातावरण खराब करायचं, असं काम गेले काही दिवस राणा दाम्पत्याने काम केलं आहे. सर्व धर्म समभावाच्या विचारांचा अपमान करायचा. समाजात दुही निर्माण करुन आपला राजकारणाचा डाव साधायचा, अशा प्रकाराचं त्यांचं राजकारण आहे. जे भगवंतांना विकतात ते कोणाचेही झालेले नाही, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केलीये.
थोडक्यात बातम्या-
“भीती वाटत असेल तर आदित्य ठाकरेंसोबत अयोध्येला जा, माफीचीही गरज नाही”
मान्सून संदर्भात मोठी अपडेट; राज्यात ‘या’ दिवशी होणार पावसाचं दमदार आगमन
पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या राजकीय निवृत्तीबाबत काँग्रेसने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
मोठी बातमी! नवाब मलिकांची प्रकृती खालावली; महत्त्वाची माहिती समोर
इंडियन टीमच्या ‘गब्बर’ची बॉलिवूडमध्ये एंट्री, शिखरच्या नव्या इनिंगला लवकरच सुरूवात होणार
Comments are closed.