Top News महाराष्ट्र मुंबई

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात हेच राहायला हवे- यशोमती ठाकूर

मुंबई | काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून धुसफूस चालू असल्याचं दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांची नाव चर्चेत आहेत. मात्र अशातच काँग्रेस नेत्या आणि महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी यासाठी मागणी केली आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात हेच राहायला हवेत कारण ते राहिले  तर काँग्रेस पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

थोरातांनी महिलांना नेतृत्व करण्याची संधी दिली. थोरातांमुळे दोन महिलांना मंत्री होण्याची संधी मिळाली. कोणी तयार नसताना थोरातांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली  यशस्वीपणे पार पडली, असल्याचं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव चर्चेत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘नायक’ सिनेमाप्रमाणे ही तरूणी ‘या’ राज्याची या दिवशी होणार एक दिवसाची मुख्यमंत्री

अरे काय चाललंय काय?, महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?- चंद्रकांत पाटील

“विरोधी पक्षाने मुद्दा उचलल्याने मला वाटलं की मी मोठ्या राजकीय षडयंत्राचा बळी होत आहे”

सीरमला लागलेल्या आगीत एक हजार कोटींचं नुकसान झालं- आदर पुनावाला

‘…तर काँग्रेस पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही’; ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या