‘…तर काँग्रेस पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य
मुंबई | भाजपला सत्तेत दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. मात्र अशातच काँग्रेस नेत्यांनी स्वबळाचा नारा द्यायला सुरू केल्याचं दिसत आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांनीच रहायला हवं. तर आपण पुढच्या वेळेला सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही. एवढा माझा विश्वास आहे, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या काँग्रेसच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची कोणी जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी धुरा सांभाळून यश आणलं. आधी ते म्हणाले 16 जागा येतील आणि 44 जागा निवडून आल्या. 44 जागा बोलले असते तर 80 जागा आल्या असत्या, असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, येत्या काळात महिला संघटनांना ताकद देण्याची आवश्यकता आहे. बाळासाहेब थोरात आपण प्रदेशाध्यक्ष राहिलंच पाहिजे, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या. याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या यादीत असलेले विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही स्वबळाचा नारा दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
“आमची भीती खरी ठरली, गंभीर विषय सत्तेच्या शक्तीसमोर दाबण्याचा प्रयत्न तर झाला नाही??”
मला माझ्या घरातील माणसांची नावं खराब करायची नाहीत, म्हणून मी तक्रार मागे घेते- रेणू शर्मा
‘राष्ट्रवादाचं सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश झाला’; सोनिया गांधींची अर्णब गोस्वामींवर टीका
रोहिणी खडसेंनी बलात्काराच्या आरोपाच्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंची केली पाठराखण; म्हणाल्या…
Comments are closed.