महाराष्ट्र सांगली

यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर केला ‘हा’ गंभीर आरोेप!-

सांगली | काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

राज्यपाल कोश्यारी सांगलीत कृषी महाविद्यालय होण्यासाठी अडथळा आणत आहेत, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. त्या सांगलीतील आमदार विक्रम सावंत यांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

सांगली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय व्हावं अशी मागणी आहे. मात्र राज्याच्या राज्यपालपदी एक विक्षिप्त माणूस बसला आहे, असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.

तुम्ही आम्ही संविधानाने एकत्र जोडलो आहोत म्हणून एकत्र आलोय. त्याच संविधानावर प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणारा व्यक्ती आज महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून बसलाय. ते अडथळे आणत आहेत म्हणून सांगलीत कृषी महाविद्यालय होत नाहीये, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

“प्रभू श्रीरामाने शेतकऱ्यांची बाजू घेतली तर भक्त त्यांनाही देशद्रोही ठरवतील”

नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा!

शरजील उस्मानीच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर उर्मिला मातोंडकरांचं रोखठोक मत, म्हणाल्या…

‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’; भाजपच्या या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

“लोकशाहीविरोधी वागणाऱ्या कुठल्याही शक्तीला जनतेनं सोडलं नाही, त्यांना धडा शिकवला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या