बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आत्ताच मंत्रिपदाची शपथ घेतलीय, अजून खिसे गरम व्हायचेत; काँग्रेस मंत्र्याचं वक्तव्य

वाशिम | महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी होऊन आठवडा उलटला तरी मंत्रिपदाचं वाटप झालं नव्हतं, ते झालं नाही तेच मंत्र्यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु केली आहे. काँग्रेस नेत्या आणि नव्या सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचा यासंदर्भातील एक व्हीडिओ समोर आला आहे.

मी तर आत्ताच मंत्रिपदाचीच शपथ घेतली आहे, अजून खिसे गरम व्हायचे आहेत, असं यशोमती ठाकूर म्हणत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने आयोजित सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

काय काय गेम होतात हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. आपलं काही सरकार नव्हतं.  आत्ता मी शपथच घेतलीय, अजून खिसे गरम व्हायचेत, मला जिल्हाध्यक्षांनी आल्याआल्या सांगितलं, की ताई जमलं नाही आमचं, म्हणे सेक्रेटरीला सांगितलं तर त्यांनी तुमचं नाव सांगितलं. बघू मी प्रदेशाध्यक्षांशी बोलते. करायचं आहे ते आम्ही करु… पण जे आपले विरोधक आहेत त्यांचे खिसे बंबाटच भरलेत. त्यांचे खिसे खाली करण्यासाठी ते आपल्या घरी येत असतील त्यांना नाही म्हणू नका, घरी आलेल्या लक्ष्मीला नाही म्हणू नका, असं त्या म्हणाल्याचं व्हीडिओत स्पष्ट दिसतंय.

दरम्यान, आपल्या या वक्तव्यामुळे नुकतंच मंत्रिपद मिळालेल्या यशोमती ठाकूर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More