बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बरं झालं स्वामी बोलले, नाहीतर राष्ट्रदोह झाला असता- यशोमती ठाकूर

मुंबई | इस्त्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकारांवर पाळत ठेवण्यात येत होती. या प्रकरणाचा छडा फाॅरेन्सिक तपासातून झाल्याचा खळबळजनक दावा ‘द वायर’ या वृत्तसंस्थेसह जगभरातील 15 मीडिया संस्थांनी केला होता. या साॅफ्टवेअरद्वारे भारतातील 300 हून अधिक लोकांवर नजर ठेवण्यात येत असल्याचा खुलासा या वृत्तामध्ये करण्यात आला होता. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोणतेही फोन टॅपिंग झालं नसल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. यावरून विरोधकांनी सरकारला सळो की पळो करून सोडलं आहे.

फोन टॅपिंगप्रकरणावरून काँग्रेस नेत्या आणि महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. मात्र भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत केंद्र सरकारची पोलखोल केली. यानंतर केंद्र सरकारने सत्य लपवण्याऐवजी ते सर्वांसमोर आणावं, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

लपवण्यासारखं काही नाही, तर मोदी यांनी इस्राईलला विचारून पेगासस प्रकरणी कोणाला पैसे दिले याची माहिती घ्यावी आणि ती उघड करावी असं आव्हानच सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला दिलं आहे. भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी यांनी ही मागणी केल्याने केंद्र सरकार लपवाछपवी करत आहे हे स्पष्ट झालंय, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय.

सुब्रमण्यम स्वामी यांच्याच मागणीचा भाजपने तातडीने विचार करून देशासमोर सत्य उघड करावं. स्वामी यांनी मागणी केल्याने आता सुंठीवाचून खोकला गेला असं म्हणावं लागेल. अन्यथा, काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांनी याबाबत मागणी केली असती तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करायला सरकारने मागेपुढे पाहिले नसते, असा टोला यशोमती ठाकूर यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान,

 

 

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईमध्ये अवघे ‘इतके’ रुग्ण सक्रिय

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

“गुन्हेगार मला शुभेच्छा देतायत त्यात माझा काय दोष?, चुकीचे होर्डिंग असतील तर भाजपने काढावेत”

चिंता वाढली! नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात लक्षणीय वाढ

‘या’ वेळेमध्ये सर्वाधिक भारतीय पाहतात पॉर्न, ‘हे’ राज्य आहे पहिल्या स्थानावर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More