मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल भूमिका मांडली होती. यावरून यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत महाविकास आघाडीतील नेत्यांना इशारा दिला आहे.
आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आले आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की, हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणं टाळावं, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय.
आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका झाल्यानं महाआघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळालं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“भाजपला भाजपचेच अहंकारी नेते कसे बुडवतात, हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल”
अमरावतीत भाजप आणि महाविकास आघाडीला धक्का; अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी
“अमित शहा आणि योगी आदित्यनाथ जिथे जिथे प्रचारासाठी गेले, तिथे भाजपचा पराभव झाला”
“एकट्याने लढण्याची चंद्रकांतदादांची खुमखुमी चांगलीच जिरली”
तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यास जतन आणि संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांकडून 50 लाख रुपये जाहीर!
Comments are closed.