बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांसाठी मोठा निर्णय’; यशोमती ठाकूर यांची मोठी घोषणा

मुंबई | कारोनामुळे सध्या देशात थैमान घातलं आहे. कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावा लागला आहे. कोरोनाने अनेक कुटुंबच्या कुटुंब खाल्ली आहेत. यामध्ये कोरोनामुळे आई-वडील गेल्यामुळे अनेक बालकं अनाथ झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

कोविडमुळे अनाथ बालकांची मोठी समस्या संपूर्ण देशातच निर्माण होत असल्याचे चित्र आहे. ही एक सामाजिक समस्या बनत आहे. मात्र अशा अनाथ बालकांचे पालन, पोषण, संरक्षण, शिक्षण आदी संपूर्ण जबाबदारी घेण्याचे कर्तव्य आणि जबाबदारी आम्ही राज्य शासन म्हणून पूर्ण क्षमतेने पार पाडू, असं महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या बाल न्याय समितीमार्फत (जे जे कमिटी) कोविड-19 या रोगाच्या अनुषंगाने राज्यातील बालकांची काळजी व संरक्षणासंबधी बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित मुद्यांच्या अनुषंगाने व इतर मुद्यांबाबत जिल्हा स्तरावर टास्क फोर्स गठित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मुलांचं यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल ठित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

दरम्यान,  दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वोतोपरी संरक्षण उपलब्ध करून देणे व अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार अथवा तस्करी सारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाहीत याची दक्षता घेणे; अशा बालकांच्या दत्तक विधानाबाबत समाजमाध्यमांमध्ये चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम पोलीस आयुक्त/ अधिक्षक (ग्रामीण) यांच्याकडून केले जाईल.

थोडक्यात बातम्या- 

राहुलचा मृत्यूआधीचा व्हिडीओ शेअर करत पत्नीने रूग्णालयावर केले आरोप, मरणापूर्वीचा व्हिडीओ आला समोर

“भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातंय, सर्वाधिक छळ गोपीनाथ मुंडेंचा झाला”

‘…हे पाहून अतिशय दु:ख होतय’; लालू प्रसाद यादव यांनी मोदींना सुनावलं

“अभिनेता अरबाज खानकडूनही परमबीर सिंह यांनी पैसे घेतले”

“मोदींनी देशाला चीनचा कचरा, चिंता आणि चिता हे तीन चि दिले”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More