बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अजित पवार आम्हाला…’; यशोमती ठाकूर यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप

मुंबई | अर्थमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत, असा आरोप काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

मागील कित्येक वर्षांपासून बालसंगोपनाचे पैसे वाढलेले नव्हते. या कामाला 450 रुपये मिळत होते. आपण आता आम्ही हे वाढवून 1,125 रुपये केले. यासाठी किमान 2,500 रुपये मिळावेत अशी माझी इच्छा आहे. असा प्रस्ताव आम्ही पाठवलाय. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत. त्यामुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत मदत केल्यास त्यांचीही साथ मिळेल, असं त्या म्हणाल्यात.

महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसं पोहोचायचं याचाच विचार आम्ही करत आहोत. सामान्य लोकांना ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, यशोमती ठाकूर यांच्या आरोपावर अजित पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच यशोमती ठाकूर यांच्या या आरोपामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या- 

मी मोदींवर खूप प्रेम करतो, ते मला आवडतात- शायर मुनव्वर राणा

“राज्यानं केंद्राकडे बोट करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवला”

“गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर…”

आढळराव पाटलांचा गृहमंत्र्यांना इशारा, म्हणाले…

“नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेत आणलं, माझ्यावर टीका करुन त्यांना…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More