बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाकाळात यशराज फिल्म्सचा मदतीचा हात, ‘या’ 30 हजार लोकांसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय

मुंबई | भारतात कोरोना संसर्गाच प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे बर्‍याच चित्रपटांचे आणि टीव्ही मालिकांचे शूटिंग बंद झाले आहे. महाराष्ट्र सरकारनेही राज्यभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. त्यासोबतच लसीकरणाचा नवीन टप्पा सुरू झाला आहे. तर अशावेळी यशराज फिल्म्सनं चित्रपटसृष्टीतील सदस्यांना मोफत लसीकरण देण्याचा निर्णय घेतला आहे. एफडब्ल्यूईसीच्या पत्रानुसार यशराज फिल्म्सनं ‘एम अँड ई’ उद्योगातील 30 हजार सदस्यांना मोफत लसी देण्याचा निर्णय घेतला आहे

या पत्रात यशराज फिल्म्सनं म्हटलं आहे की, चित्रपटसृष्टीतील अनेक लोक साथीच्या आजारानं खूप अस्वस्थ होत आहेत, म्हणून लसीकरणाचं हे काम लवकर सुरु केलं पाहिजे जेणेकरुन हजारो कामगार लवकरात लवकर पुन्हा काम सुरू करू शकतील. पत्रात प्रोडक्शन हाऊसनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लस विकत घेण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली असून, यशराज फाउंडेशन ही रक्कम देईल, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजनं उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, यशराज फिल्म्सची ही विनंती मान्य करण्यास सांगितली आहे. तर सदस्यांना लवकरात लवकर लसी देण्याची विनंतीही केली आहे.

दरम्यान, त्यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘लसीकरण केवळ या रोगाशी लढायलाच नव्हे, तर राज्यातील ढासळणारी अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत करेल. त्यांनी पत्रात मुख्यमंत्र्यांकडे 30 हजार कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार यांच्या लसीकरणाला मान्यता देण्याची मागणी केली आहे.’

 

 

 

थोडक्यात बातम्या

कोरोनाचे उपचार घेताना ‘हे’ औषध घेतलं तर झपाट्याने पसरेल कोरोना; एम्स संचालकांचा इशारा

…म्हणून कंगणा राणावतला कोसळलं रडू, पाहा व्हिडीओ

आनंदाची बातमी! भारतातील ‘ही’ लस कोरोनावर प्रभावी; ICMR च्या संशोधनातून समोर आले निष्कर्ष

पत्नी आणि मुलीसाठी सुट्टी मिळाली नाही; पोलिस अधिकाऱ्याचा बेधडक निर्णय

आईला कोरोना, बेड मिळेना, मात्र मुलगा आणि मुलीनं हार मानली नाही; एका धैर्याची कहाणी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More