बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोणताही क्लास न लावता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशवंतने UPSC केली क्रॅक!

मुंबई | परळी वैजनाथ येथील यशवंत अभिमन्यू मुंडे यांने नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. संपूर्ण भारतातून 502 व्या स्थानी येत त्याने अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केलं आहे. अभिमन्यूने इंजिनिअरिंग केल्याची माहिती त्याने दिली आहे.

अनेक जण मोठे मोठे क्लास आणि कोचिंग घेत या परीक्षांची तयारी करत असतात. यासाठी तसे पैसे देखील मोजावे लागतात. मात्र कोणताही क्लास न लावता यशवंतने UPSC क्रॅक केली आहे.

दररोज 10 तास मी अभ्यास केला, कुठलेही क्लासेस मी लावलेले नाहीत. तरुणांमध्ये जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कुठलेही उद्दिष्ट अशक्य नाही. इतरांकडून तर प्रेरणा घ्याच पण आत्मप्रेरणा आणि अभ्यासाच्या बाबतची निष्ठा प्रामाणिक असली पाहिजे, असं म्हटलंय.

दरम्यान, मी सुद्धा अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगा असून माझे वडील निवृत्त क्रीडा शिक्षक आहेत तर आई गृहिणी आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण परळीत झाल्यानंतर लातूरमध्ये मी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी नोकरी न करता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला, असं त्याने सांगितलंय.

थोडक्यात बातम्या- 

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

रोमांचक सामन्यात पंजाबचा दणदणीत विजय! सनरायजर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव

धक्कादायक! पुण्यातील ढोल-ताशा पथकाला हैदराबादेत डांबलं, 15 मुलींचाही समावेश

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More