जगाला हेवा वाटावा असा विक्रम पाकिस्तानी गोलंदाजाच्या नावावर!

अबुधाबी | जगाला हेवा वाटावा असा विक्रम पाकिस्तानचा लेग स्पिनर यासिर शाहनं केला आहे. त्यांने अवघ्या 33 कसोटींमध्ये 200 बळी घेण्याचा पल्ला गाठून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 200 बळी घेण्याचा 82 वर्ष जूना विक्रम त्याने आपल्या नावावर जमा केला आहे.

याआधी आॅस्ट्रेलियाचा लेग स्पिनर क्लॅरी गिमेट याने 1936 मध्ये 36 सामन्यांत हा व्रिकम केला होता. आता यासिरनं अवघ्या 33 सामन्यांत हा विक्रम केला आहे.

दरम्यान, अबूधाबी कसोटीत न्यूझीलंडच्या विल सोमरवील हा यासिरचा 200 वा बळी ठरला.

महत्वाच्या बातम्या-

-‘वसुंधरा राजे खूप जाड झाल्या आहेत, त्यांना आराम द्या’ वक्तव्यावर शरद यादवांच स्पष्टीकरण

-मलाही लग्न करुन सुखी संसार थाटायचा होता, पण… – कतरिना कैफ

-भाजपला मोठा झटका; मोदी सरकारमधील हा मंत्री काँग्रेससोबत जाणार???

-शेतकरी आक्रोश करत आहे, हे राज्य कारभारास लांच्छन- उद्धव ठाकरे

-…म्हणून गायक मिका सिंगला दुबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या