बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर आम्ही खपवून घेणार नाही’; वानखेडे-मलिक वादात आता मनसेची उडी

मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळं राज्यातील वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. सीबीआय, ईडी, एनसीबी, आयकर विभाग सध्या राज्यभर कारवाई करत आहेत. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणाला तर आता राजकीय वळण आलं आहे. एनसीपी आणि एनसीबी आर्यन खान प्रकरणावरून एकमेकांसमोर उभं ठाकले आहेत.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीची कारवाई ही बाॅलिवूडला बदनाम करण्यासाठी केली आहे, असा आरोप केला होता. नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणात जास्मीन वानखेडेवर जोरदार आरोप केले होते. जास्मीन वानखेडे आणि समीर वानखेडे यांनी बाॅलिवूडमधील कलाकारांकडून दुबईत जाऊन वसूली केल्याचा गंभीर आरोप केला होता. हे सर्व आरोप जास्मीन वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत.

जास्मीन वानखेडे या मनसेच्या पदाधिकारी आहेत. मनसे नेते अमेय खोपकर यांनी जास्मीन वानखेडे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन मलिक यांच्या आरोपांचं खंडण केलं आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांवर खालच्या पातळीची टीका केल्यास आम्ही खपवून घेणार नाही, असं अमेय खोपकर म्हणाले आहेत.

दरम्यान, बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान या प्रकरणात खोलात अडकला आहे. एनसीबीची कारवाई ही राज्याला बदनाम करण्यासाठी केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. जास्मीन वानखेडे आणि समीर वानखेडे यांच्याकडून या सर्व आरोपांचं खंडण करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या

शाहरूख खान लेकाच्या भेटीला तर ‘मन्नत’वर एनसीबीचा छापा

आई आणि DSP दोन्ही कर्तव्य पार पाडली, लेकराला पोटाला बांधून DSP मुख्यमंत्र्यांच्या ड्यूटीवर

पिंपरीमध्ये वाईन शाॅप मालक आणि ग्राहकात तुफान राडा, पाहा व्हिडीओ

टाटा मोटर्स लवकरच करणार सीएनजी कार लाँच; ‘ही’ असणार किंमत

700 कोटींचा घोटाळा झाल्याचा संजय राऊतांचा दावा; किरीट सोमय्यांना केलं लक्ष घालण्याचं आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More