सिंचन प्रकल्प गैरव्यवहार, अजित पवारांना दिलासा नाहीच!

नागपूर | यवतमाळमधील सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांना दिलासा देण्यास नागपूर खंडपीठाने नकार दिला. प्रतिवादी म्हणून नाव वगळण्याची त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली. 

कागदपत्रांची पूर्तता नसताना बाजोरिया कंस्ट्रक्शनला प्रकल्पांची कामं मिळवून दिल्याचा आरोप अजित पवारांवर आहे. चांदूर रेल्वे आणि वाघाडी प्रकल्पांची कामे अनुक्रमे 2010 आणि 2012 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पाची अद्याप 50 टक्केही कामं पूर्ण झालेली नाहीत.

दरम्यान, या प्रकरणी प्रतिवादी असलेल्या अजित पवारांचं नाव वगळण्याची त्यांच्या वकिलांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.