यवतमाळ | यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे.शिवसेनेच्या तिकीटावर रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी विजयी झाले आहेत तर भाजपच्या सुमित बाजोरिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
दुष्यंत चतुर्वेदी यांनी पहिल्या फेरीत 298 मतांचा कोटा पूर्ण करत विजयी आघाडी घेतली आहे. भाजपच्या समित बाजोरिया यांना पहिल्या फेरीत 185 मतं मिळाली होती तर 6 मतं बाद ठरली होती. दुष्यंत चतुर्वेदींचा विजय निश्चित होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली होती.
यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी शुक्रवार 31 जानेवारीला मतदान झालं होतं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीचं पारडं आधीपासूनच जड मानलं जात होतं.
दरम्यान, यवतमाळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतून शिवसेनेचे तानाजी सावंत विधानपरिषदेचे सदस्य होते. ते उस्मानाबादमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या जागी माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली.
ट्रेंडिंग बातम्या-
बाप बाप होता है; सचिन अहिरांचा आशिष शेलारांना टोला!
‘बांगलादेशी घुसखोरांनो तुमच्या देशात निघून जा’; मनसेचा इशारा
महत्वाच्या बातम्या-
हेगडे यांच्या वक्तव्यावर भाजपश्रेष्ठींनी माफी मागावी- बाळासाहेब थोरात
अमित शहांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा अभ्यास सुरु!
हिंदू स्त्रियांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायांचं पूजन केलं पाहिजे- विक्रम गोखले
Comments are closed.