महाराष्ट्र यवतमाळ

…अन् ऑनलाईन पेपर सोडवून मगच नवरी बोहल्यावर चढली

यवतमाळ | यवतमाळमध्ये ऑनलाईनसाठी परीक्षेसाठी लग्नाचा मुहूर्त काहीकाळ पुढे ढकलण्यात आला. ऑनलाईन पेपर सोडवून मगच नवरी बोहल्यावर चढली.

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील सारीका अरुण शिखरे हिचा शुभविवाह अमरावती येथील निलेश साबळे यांच्यासोबत ठरला होता. मंगलाष्टकासाठी सज्ज होती. अशात नवरीला काही वेळातच आपली ऑनलाईन परीक्षा असल्याचं समजलं.

नवरीने नवरदेवाला निरोप पाठवला की बीएससी अॅग्रो सहकार विषयाचा 2 ते 2.40 पर्यंत ऑनलाईन पेपर आहे. ते सोडवून आपण लग्न करु.

नवरीने आनंदाने आपल्या वर्गमैत्रिणीसोबत ऑनलाईन पेपर सोडवला आणि नंतरच ती बोहल्यावर चढली. मंगलाष्टके होऊन विवाह पार पडला. 25 डिसेंबर रोजी हे लग्न पार पडलं.

थोडक्यात बातम्या-

“भाजपची ईडी आता सनम बेवफा झाली आहे; तिकडे फिरकलीच नाही”

मी त्यांना सांगितलं होतं, मात्र माझं कोणी ऐकलंच नाही- रोहित पवार

“तुम्ही चार द्या, पण दोन घ्यायची तयारी ठेवायलाच हवी”

…चांगलं काम केलं तर नोटीस मिळत नाही- देवेंद्र फडणवीस

“ईडीला आता कुणी घाबरत नाही, शरद पवार आणि ठाकरेंना नोटीस आली पुढे काय झालं?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या