Top News देश

भारतीयांच्या क्षमतेवर माझा विश्वास, देश पुन्हा विकासाच्या मार्गावर परतेल- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | सीआयआयला 125 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना भारतीयांच्या क्षमतेवर माझा विश्वास असल्याचं सांगत देश पुन्हा विकासाच्या मार्गावर परतेल, असा विश्वास व्यक्त केला.

भारताची क्षमता, प्रतिभा, टेक्नोलॉजी, संकट व्यवस्थापन, कल्पकता, शेतकरी आणि इंडस्ट्रीचे नेतृत्व करणाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे भारत निश्चित विकासाच्या मार्गावर परतेल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

करोनामुळे आपला वेग कितीही धीमा झाला असला तरी, भारताने लॉकडाउनला मागे सोडून अनलॉक फेज १ मध्ये प्रवेश केला आहे. अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा सुरु झाला आहे. आठ जूननंतर त्यामध्ये अधिक गती येईल, असं त्यांनी सांगितलं.

करोना व्हायरस विरुद्ध लढताना अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकट करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यासाठी सरकारने तात्काळ आवश्यक पावले उचलली. दीर्घकाळाच्या दृष्टीने देशाच्या हिताचे ठरतील असे अनेक निर्णय घेतले आहेत, असं मोदींनी यावेळी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाविरोधी लढ्यात केरळची महाराष्ट्राला मोलाची मदत, मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांनी मानले आभार

सगळ्या माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीची सक्ती, अन्यथा शाळांवर कारवाई करणार- शिक्षणमंत्री

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून 48 तासांसाठी रायगड जिल्ह्यात संचारबंदी, पालकमंत्री आदिती तटकरेंची घोषणा

लोकांकडे पैसेच नाहीत तर उत्पादन केलेल्या वस्तू कोण घेणार?; पृथ्वीबाबांचा मोदींना सवाल

देशातली कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांजवळ, गेल्या 24 तासांत तब्बल इतक्या जणांना कोरोना!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या