बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दिवसभर सायकल चालवून भाजपसाठी काम केलं, तेव्हा…”

बंगळुरू | कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकात भाजप सरकारला नुकतंच 2 वर्ष पुर्ण झाली आहेत. यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा देत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे.

मी माझ्या राजकीय जीवनात कायमच अग्निपरिक्षा दिली आहे. जेव्हा कार नव्हत्या तेव्हा मला आठवतंय की, मी सायकल चालवून पक्षाचं काम दिवसभर केल होतं. शिमोगाच्या शिकारीपुरामध्ये आम्ही ठराविक कार्यकर्त्यांसोबत कर्नाटकमध्ये पक्ष उभा केला होता. तेव्हा पक्षासोबत कोणीही नव्हतं, असं वक्तव्य येडियुरप्पा यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात सरकार स्थापन व्हावं अशी माझी इच्छा होती. ती आता पुर्ण झाल्याचं देखील येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे. ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यावेळी त्यांनी मला केंद्रात मंत्री बनण्यास सांगितलं होतं. परंतु त्यावेळी वाजपेयी यांना नकार देत कर्नाटकातच राहणार असल्याचं सांगितलं होतं, असंही येडियुरप्पा म्हणाले.

दरम्यान, आजच कर्नाटकमध्ये सरकार स्थापन होऊन दोन वर्ष पुर्ण झाली आहेत. येडियुरप्पा यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. त्यानंतर कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गहलोत यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे. परंतु नवीन मुख्यमंत्र्यांची शपथ होत नाही तो पर्यंत येडियुरप्पा हे कर्नाटकचे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

…ती महिला माझ्या मुलीसारखी होती- भास्कर जाधव

“भास्कर जाधवांचा अरेरावीचा प्रकार मालकाला खूश करण्यासाठी”

मोठी बातमी! कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केली राजीनाम्याची घोषणा

बॉसने दरडावल्याने तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More