भाजपचं मिशन कर्नाटक, येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा

नवी दिल्ली | कर्नाटकमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपने तयारी सुरु केलीय. याचाच एक भाग म्हणून माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलंय. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ही घोषणा केलीय.

कर्नाटकमध्ये भाजपचे पहिले सरकार येडियुरप्पा यांच्या नेतृत्वातच सत्तेवर आले होते. मात्र खाण घोटाळ्यातील आरोपांमुळे त्यांना पायउतार व्हावे लागले होते. आता पक्षांतर्गत कलह सोडवून येडियुरप्पांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या