नागपूर | ‘हे शेतकऱ्यांचं आंदोलन नसून या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे, असं वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. याच मुद्यावरुन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दानवे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
शेतकऱ्यांचा अवमान करणारे रावसाहेब दानवे हे येडपट आणि भैताड आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना केली. हे भैताड राजकारणात कसं आलं माहीत नाही. कार्टुन जसे वागतात तसेच हे वागत आहेत, असंही वडेट्टीवार म्हणाले.
बच्चू कडू यांनी सांगितल्याप्रमाणे दानवेंच्या कमरेत डावा किंवा उजवा घातला पाहिजे. शेतकऱ्यांचा अनादर करणाऱ्या व्यक्तिला भाजपमध्ये मंत्री केलं जातं. त्यामुळे भाजपची किव येते असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रावसाहेब दानवे यांची जीभ कापणाऱ्या व्यक्तीला दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊ, अशी घोषणा यवतमाळातील शिवसेनेच्या आंदोलनात विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी केली आहे. यवतमाळमध्ये या बक्षीसाची केलेली घोषणा चर्चेचा विषय ठरत आहे.
थोडक्यात बातम्या-
“…तर 2014 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाला पाहावा लगला नसता”
धक्कादायक! ‘द डर्टी पिक्चर’ मधील अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू
जय जवान, जय किसान; वाढदिवसाच्यानिमित्त युवराज सिंगचं चाहत्यांना ‘खास’ आवाहन
आप्पा, तुम्ही अजूनहीआमच्यातच आहात, धनंजय मुंडेंनी गोपीनाथ काकांना केलं अभिवादन
रेमो डिसुझाच्या प्रकृतीबाबत मित्राने दिले अपडेट्स, म्हणाला…