‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’, मित्राला वाचवण्यासाठी दाखवली जबरदस्त हिंमत, पाहा व्हिडिओ
तिरुवनंतपुरम | सोशल मीडियात दररोज काही ना काही व्हायरल होतंच असतं की जे सर्वांचं लक्ष वेधून घेतं. सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे की जो पाहून नेटिझन्स हैराण होत आहेत. केरळच्या वाडकर येथील एक भनायक व्हिडिओ समोर आला आहे.एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गच्चीत उभा असलेला व्यक्ती चक्कर येऊन खाली पडताना या व्हिडिओमध्ये दिसून येतो.
इतक्यात बाजूला उभा असलेला त्याचा मित्र प्रसंगावधान दाखवून इमारतीवरुन खाली पडणाऱ्या आपल्या मित्राला धरतो. त्यानंतर तात्काळ इतर जण तिथं धावत येतात आणि भोवळ येऊन खाली पडणाऱ्या व्यक्तीला वर खेचून त्याचा जीव वाचवतात. भोवळ आलेल्या व्यक्तीचं नाव बिनु असल्याचं सांगितलं जात आहे.
अचानक भोवळ आल्यानं त्याचा तोल गेला आणि तो गच्चीवरुन खाली पडणार होता इतक्यात त्याचा मित्र बाबूराज यानं त्याला वाचवलं. बाबूराजनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आणि बिनु याचे प्राण वाचले.
दरम्यान, सोशल मीडियात या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून बाबूराज याच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे. मित्र असावा तर असा अशा कमेंट्सचा पाऊस या व्हिडिओवर होत आहे.
😱😱😱😱😱 pic.twitter.com/9GPTce1xnt
— Anu Satheesh 🇮🇳 (@AnuSatheesh5) March 19, 2021
थोडक्यात बातम्या –
‘ये तो सोची समझी चाल’; ठाकरे सरकारमधील मंत्र्याची भाजपवर टीका
कुंपणच शेत खात असेल तर राज्यातील जनतेने कुठे न्याय मागायचा?- चित्रा वाघ
‘…त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे’; नारायण राणेंच्या आरोपाने खळबळ
धक्कादायक! नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीचा वाद टोकाला, तरुणाची दगडाने ठेचून केली हत्या
काँग्रेस काय पाकिस्तानमधून आलेली आहे का?- संजय राऊत
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.