बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | राज्यात एकीकडे थंडी सुरू असतानाचं जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून  वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यातील काही भागांमध्ये पंधरा दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडला. (Yellow Alerts issued to 16 districts in the state)

अवकाळी पाऊसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यातच पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्याने जोरदार पावसाची (Heavy rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. रब्बी पिकांना पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे.

हवामान विभागाकडून पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यासोबतच अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदूरबाद, धुळे, औरंगाबाद आणि सातारा, सांगली या जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच दक्षिण अंदमान समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यभरात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. यामुळे 30 नोव्हेंबरपासून राज्यात पुढील तीन दिवस राज्यात धुवांधार पावसाची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या- 

नागपूर नाही मुंबईच!, “मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन मुंबईतच होणार”

मोठी बातमी! हिवाळी अधिवेशनात ‘या’ 12 खासदारांचं निलंबन, 2 शिवसेनेचे

नव्या Omicron व्हेरिएंटची लक्षणं कोणती?; आली ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

“आम्ही सरकार पाडणार नाही, ज्यादिवशी सरकार पडेल त्यादिवशी…”

‘ही’ मराठी अभिनेत्री का म्हणतेय?, हा ट्रॅप आहे यात अडकू नका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More