बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून येरवड्याच्या कारागृहातून पळून जाणं कैद्यांना सोपं गेलं!

पुणे | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहातील काही कैदी तात्पुरत्या इमारतीमध्ये हलवण्यात आले आहेत. यामधील ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील पाच कैदी आज फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील काही कैद्यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाचं संक्रमण वाढू नये यासाठी काही कैद्यांना वेगळ्या इमारतीमध्ये हलवण्यात आलं होतं. यातील अजिंक्य कांबळे, उत्तम कांबळे, सनी पिंटो, देवगण चव्हाण आणि अजिनाथ चव्हाण हे पाच आरोपी मोक्याच्या गुन्ह्यातील आहेत.

या नव्या इमारतीच्या खिडकीचा गज कापून मध्यरात्रीच्या सुमारास या पाचही कैद्यांनी पळ काढला आहे. नव्या इमारतीची सुरक्षाव्यवस्था चोख नसल्यानंच कैद्यांना पळून जाणं सोप झाल्याची माहिती आता समोर आली आहे.

दरम्यान, घटना काही वेळेतच लक्षात येताच आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पाचही जणांविरोधात आता येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

महाजाॅब योजना महाविकास आघाडीची की शिवसेना-राष्ट्रवादीची?; ‘या’ काँग्रेस नेत्यानं व्यक्त केली नाराजी

“आता रडून काय फायदा?, तुला तुझ्या पापाची फळं याच जन्मात भोगावी लागणार”

ईश्वर रूपी देवता ये… अमिताभ बच्चन यांनी लिहीली भावनिक कविता

विकास दुबे गॅंगनं कशी केली 8 पोलिसांची हत्या?; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी उघड

अतिक्रमण हटवल्यामुळे दाम्पत्यानं किटकनाशक पिलं; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांवर कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More