बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खातेदारांनी घाबरू नये, धोका पत्करायला भारतीय बँका जगात अव्वल”

नवी दिल्ली | येस बँकेवर आलेल्या संकटाबाबत बोलताना देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार के. सुब्रमण्यम यांनी खातेदारांना एक अजब सल्ला दिला आहे. खातेदारांनी घाबरुन जाऊ नये, धोका पत्करायला भारतीय बँका जगात अव्वल आहेत, अशा आशयाचं वक्तव्या त्यांनी केलं आहे.

जागतिक स्तरावर बँकांचं कॅपिटल टू रिस्क असेट रेशियो 8 टक्क्यांच्या जवळ असतो. तर भारतातील बँकांसाठी CRAR 14.3 टक्क्यांच्या जवळपास आहे. यानुसार आपल्या बँकांजवळ CRAR जागतीक स्तरापेक्षा 80 टक्के जास्त आहे, असं के सुब्रमण्यम यांनी सांगितलं आहे.

आपल्या बँकांचं सेफ्टी मार्जिनही मोठं आहे. त्यांच्याजवळ भांडवलाची कमी नाही. मात्र, खातेदारांच्या हिताबाबत बोलायचे झाल्यास नुकत्याच झालेल्या केंद्रीय बजेटमध्ये बँकांचा रिस्क इन्शूरन्स 1 लाखांवरुन 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे, असंही सुब्रमण्यम यांनी म्हटलंय.

दरम्यान, खातेदारांना घाबरण्याची काहीही गरज नाही. भारतीय बँकिंग क्षेत्र पूर्णपणे सुरक्षित आहे आणि खातेदारांचा एक-एक रुपया देखील, असं सुब्रमण्याम म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

राज ठाकरे-मिलिंद एकबोटे यांच्या भेटीवर भुजबळ म्हणाले…

“सांगितलेलं ऐकलं असतं तर आबा आज आपल्यात असते”

महत्वाच्या बातम्या-

गेल्या 20 दिवसांत चौथ्यांदा आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला!

“आपल्या मुली विश्वचषकाच्या फायनलपर्यंत गेल्या याचा आपल्याला आनंद आणि अभिमान पाहिजेच”

पुण्यातील कात्रजच्या घाटात भडकलेला वणवा सयाजी शिंदेंनी विझवला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More