बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मैं पुलिस कस्टडी में हूँ, मैं ही निशा जिंदल हूँ“

रायपुर |  पाकिस्तानी अभिनेत्री तसंच मॉडेलसहित आणखी 8 महिलांच्या नावाने बनावट सोशल मीडिया चालवणाऱ्या तसंच त्या अकाऊंटवरून लोकांशी चॅटिंग करणाऱ्या एका तरूणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. कबीर नगरमधल्या रवी पुजार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अनेक लोकांना हे बनावट अकाऊंट असल्याची शंका येत होती. त्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली. लोकांच्या तक्रारीवरून पोलिसांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी रवी पुजारवर कारवाई केली आहे.

यासंदर्भात बोलताना एसएसपी आरीफ शेख यांनी सांगितलं, “पाठीमागच्या दीड महिन्यांपासून खूप तक्रारी येत होत्या की निशा जिंदाल या फेसबुक आयडीवरून खूप मोठमोठ्या गप्पा होतायत. मी WHO कडून बोलत आहे… मी IMF कडून बोलत आहे. या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी फेसबुककडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर ती मिळाली नाही.  मग पोलिसांनी सायबर टीमच्या सहाय्याने शक्कल लढवून त्याला आपल्या जाळ्यात खेचलं.

दरम्यान, आयपी अ‌ॅड्रेस शोधला त्यावरून आम्ही जेव्हा आरोपीवर कारवाई केली तेव्हा निशा जिंदल नावाची महिला नव्हती तर तो एक पुरूष होता. गेली 8 वर्ष तो फेसबुक अकाऊंट वापरत असल्याची माहिती देखील तपास अधिकारी आरीफ शेख यांनी दिली आहे.

निशा जिंदल या अकाऊंटला जवळपास 4 हजार फ्रेंड आहेत. आरोपी याच अकाऊंटवरून खूप साऱ्या लोकांशी चॅट करत असे. त्याने आपल्या कुटुंबातील लोकांना देखील आपल्या फेसबुक अकाडऊंटला फ्रेंड करून घेतलं होतं. त्याच्याविरूद्ध आता पोलिसांनी कलम 153, 295 ए आणि आयटी अ‌ॅक्टनुसार गुन्हा नोंदवला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यातील मजुरांना दिलासा; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

कोरोनाशी लढा देणाऱ्यांसाठी 45 खोल्यांचं हॉटेल खुलं; शिवसेना नगरसेवकाचा निर्णय

महत्वाच्या बातम्या-

कोरोनावर लस शोधल्याचा Oxford विद्यापीठाचा दावा!

कुठल्याही परिस्थितीत रुग्ण वाढता कामा नये, पुण्यात आठ दिवस कडकडीत बंद ठेवा- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More