बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हो, मी भाजप नेत्याला फोन केला होता पण…”- ममता बॅनर्जी

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमध्ये राजकारण चांगलचं तापलं आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भजपा नेते प्रलय पाल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्याला फोन करून नंदीग्राममधील विजयासाठी मदत मागितली असल्याचा दावा प्रलय पाल यांनी केला आहे. पाल यांच्या या दाव्याने बंगालच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

याचदरम्यान, ममता बॅनर्जी यांनी त्या फोनबाबत सांगितलं आहे. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या एका माजी नेत्याला ज्याने भाजपमध्ये प्रवेश केला. त्याला मी फोन केला होता. फोन करणं कुठलाही गुन्हा नाही. दोषी त्यांना ठरवलं पाहिजे, त्यांनी विश्वासघात केला आणि बातचीत लीक केली, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.

मी नंदीग्राममधील एका भाजप नेत्याला फोन केला होता. कोणाला तरी आपल्याशी बोलायचं, असं सांगण्यात आलं होतं. यामुळे त्यांचा नंबर घेऊन मी फोन केला होता. तुम्ही तिथे व्यवस्थित राहा आणि आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असं मी त्यांना म्हणाले होते. हा काय माझा गुन्हा आहे का?, असा सवाल देखील ममता बॅनर्जींनी यावेळी केला आहे.

दरम्यान, मतदारसंघातील उमेदवार असल्याच्या नात्याने मी कुठल्याही मतदाराची मदत घेऊ शकते. मी कुणालाही फोन करू शकते. यात वाईट काय आहे. हा कुठला गुन्हा नाही. पण जर कुणी बातचीत लीक करत असेल, तर तो गुन्हा आहे. हा गुन्हा माझ्याविरोधात नाही तर त्या व्यक्तीविरोधात ज्याने माझ्याशी झालेली चर्चा लीक केली, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

इम्तियाज जलील यांचा जल्लोष पाहिल्यानंतर, अमेय खोपकर म्हणतात…

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात 80 टक्के कोरोनाबाधितांना लक्षणंच नाही

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर केला ‘हा’ गंभीर आरोप

1 एप्रिलपासून ‘या’ वयोगटापुढील व्यक्तींना मिळणार कोरोना लस, असा लावा नंबर!

“…तर सचिन तेंडूलकर, लक्ष्मण आणि गांगूली कधीच पास झाले नसते”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More