मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ घरी बसलेले असतात अशी टीका सतत विरोधकांकडून कऱण्यात येते. दरम्यान या विरोधकांना आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले, “होय, मी घरी बसून काम करत होतो. शिवाय मीच नागरिकांना घरी राहा आणि सुरक्षित राहा असा सल्ला दिला होता. घरी बसून काम केल्यानेच आज हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन होतंय.”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 1680 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचं आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आलं. 174 कोटींचे सफारी पार्क तसंच 152 कोटींच्या रस्त्यांची कामं केली. त्याचप्रमाणे 25 कोटी रुपये खर्चाच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं भूमिपूजन देखील करण्यात आलं.
पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे शिष्य श्रीखंड्या यांनी कावडीमधून पाणी आणून हौद भरलेला. तर औरंगाबादेतील लाखो नागरिकांची तहान भागवण्यासाठी आपण श्रीखंड्या होण्यास तयार असल्याचं, उद्धव ठाकरे म्हणालेत.
थोडक्यात बातम्या –
“लव्ह जिहादच्या नावाखाली परदेशातून फंडिंग, हिंदू मुलींची लावतात बोली”
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमात केक खाण्यासाठी उडाली झुंबड; पाहा व्हिडीयो
‘…तर तुम्हाला आज धनंजय मुंडे दिसला नसता’; धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य
‘या’ राज्यात नागरिकांना कोरोना लस मिळणार मोफत, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
“देशात एकच राज्यपाल आहेत आणि तेच सर्व निर्णय घेतात, असं या रामाला वाटत असावं”