परभणी | मराठा ठोक मोर्चाला विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे. परभणीतील धरणे आंदोलनादरम्यान एका मुस्लिम तरूणाने मुंडन करून मराठा मोर्चाला आपला पाठिंबा दिला.
पाथरी शहरात गेल्या सहा दिवसापासून मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देत बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शेख मोईनोद्दीन या मुस्लिम तरूणानं राष्ट्रीय महामार्गावर बसून भाजप सरकारचा निषेध करत मुंडन करून घेतले.
दरम्यान, मराठा आरक्षणावरून ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन केले जात असून त्याला विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मुख्यमंत्र्यांचे आदेश आले अन् महापौर-उपमहापौरांनी राजीनामे दिले!
-उद्या मुंबई बंद; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा
-मराठा आमदारांविरोधात तीव्र संताप; श्रद्धांजलीचे फोटो व्हायरल
-महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ‘तो’ जुना फोटो व्हायरल
-मराठा आंदोलनाला दिशा देण्यासाठी पुण्यात बैठक सुरू