बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काल त्यांनी प्रति विधानसभा मांडली, उद्या प्रति संविधानही मांडतील”

मुंबई | मुंबईत दोन दिवसाचं विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. या दोन्ही दिवशी सभागृहात आणि सभागृहाबाहेर भाजपने गोंधळ घातला होता. त्या अधिवेशनादरम्यान भाजपच्या 12 आमदारांना निलंबित देखील करण्यात आलं. त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपने जोरदार राडा करत प्रतिविधानसभा भरवली. त्यावरूवन भाजपवर टीका करण्यात येत आहे. त्यावर आता राष्ट्रवादीनेही टीका केली आहे.

काल त्यांनी प्रति विधानसभा मांडली, उद्या प्रति संविधानही मांडतील. सावधान रहें, सतर्क रहें, असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नशिबामध्ये राजयोग होता. मात्र हा राजयोग प्रति विधानसभा निर्माण केली त्या ठिकाणी होता. मात्र दुर्दैवाने ही सुद्धा संधी त्यांना मिळाली नाही!, अशी खोचक टीका रुपाली चाकणकर यांनी भाजपवर केली आहे.

2014 ला केंद्रात भाजप सरकार आल्यापासून संविधानाच्या धोक्याविषयी मोठी चर्चा होत आहे. केंद्र सरकारच्या एकामागून एक मोठ्या निर्णयामुळे काँग्रेसने संविधान धोक्यात असल्याचा इशारा मागे दिला होता. आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशाऱ्यावर चालणारे केंद्रातील मोदी सरकार आरक्षण संपवण्यासाठीच काम करत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली होती.

दरम्यान, महाराष्ट्राच्या सुसंस्कृत लोकशाही परंपरेला भाजपने काळे फासलंय. राज्याच्या सर्वोच्च सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत बोलणे, त्यांच्या समोरील माईकची तोडफोड करणे अशी गुंडगिरी सभागृहात अशोभनीय आहे. आज वर्षभरासाठी निलंबित झालेत पण जनता यांना कायमचं निलंबित करणार, असं ट्विट चाकणकर यांनी केलं होतं.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

…असं काहीतरी होणारच होतं, कारण ईडी ही भाजपची प्रेयसी आहे- अमोल मिटकरी

दिलीप कुमार यांचं निधन हे आपल्यासाठी एक सांस्कृतिक नुकसान आहे- नरेंद्र मोदी

‘युसूफ खान ते दिलीप कुमार’; वाचा हिंदी सिनेसृष्टीच्या पहिला सुपरस्टारचा प्रवास

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना सर्वात मोठा दणका!

‘फडतूस माणसांबद्दल मी बोलत नाही’; भास्कर जाधवांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More