बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यो यो हनी सिंगच्या अडचणीत वाढ; पत्नीनं दाखल केली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार

मुंबई | बॉलिवूडमधील प्रसिद्ध पॉप आणि रॅप गायक यो यो हनी सिंग नेहमीच त्याच्या अनोख्या गाण्यांमुळे आणि हटके स्टाईलमुळे चर्चेत असलेला पाहायला मिळतो. मात्र सध्या हनी सिंग एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. यो यो हनी सिंग विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची पत्नी शालिनी तलवार हिनं हनी सिंगच्या विरोधात हा खटला दाखल केला आहे.

यो यो हनी सिंगची पत्नी शालिनीनं त्याच्याविरोधात दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायद्याअंतर्गत याचिका दाखल केली आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयानं हनी सिंगला नोटीस पाठवली असून त्याच्याकडून याविषयी उत्तर मागितलं आहे. 28 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यासाठी हनी सिंगला मुदत देण्यात आली आहे.

पत्नी शालिनी तलवारनं दाखल केलेल्या याचिकेत लैंगिक हिंसा, मानसिक छळ, घरगुती हिंसा आणि तिच्यासोबत आर्थिक फसवणुकीचाही आरोप केला आहे. याशिवाय हनी सिंगचे आई वडील आणि बहिण यांच्या विरोधातही मारहाण करणं, छळ आणि शोषण करण्याचे आरोप केले आहेत. 

दरम्यान, शालिनीनं याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयानं कौटुंबिक हिंसाचाराचं प्रकरण असल्यामुळे हनी सिंह स्वतःच्या आणि पत्नीच्या संयुक्त मालमत्तेबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, असे निर्देश दिले आहेत.

थोडक्यात बातम्या –

‘माझ्या अंगावरून गाडी घाला’; पुण्यात भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा

“खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार”

पुण्याला झिका व्हायरसचा धोका?; केंद्रीय पथक तातडीने पुण्यात दाखल

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ विचित्र अपघात, ट्रकची 6 वाहनांना धडक!

भाजपच्या ‘या’ माजी आमदाराला मोठा धक्का! पत्नीच्या शैक्षणिक संस्थेला कोट्यवधींचा दंड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More