…तर गुजरातमध्ये भाजपला मिळू शकतात फक्त 65 जागा!

अहमदाबाद | गुजरात विधनासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. असाच एक भाजपची चिंता वाढवणारा तर्क समोर आलाय. 

निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांचा हा तर्क आहे. CSDS आणि ABP यांच्या सर्व्हेमध्ये भाजप आणि काँग्रसेला प्रत्येकी 43 टक्के वोट शेअर मिळेल असं दाखवण्यात आलंय त्यावरुन योगेंद्र यादव यांनी हा अंदाज वर्तवलाय. 

दोन्ही पक्षांना प्रत्येकी 43 टक्के वोट शेअर मिळालं तर भाजपला 83 तर काँग्रेसला 95 जागा मिळतील आणि जर काँग्रेसचे वोटशेअर 2 टक्क्यांनी वाढून भाजपचे दोन टक्क्यांनी कमी झाले तर भाजपला फक्त 65 जागा मिळतील तर काँग्रसेला 113 जागा मिळतील, असा योगेंद्र यादव यांचा अंदाज आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या