पुणे | भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले हे भाजपचे शहराध्यक्ष आहे की भाजपचे एजंट आहे?, असा वादग्रस्त सवाल काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी देण्यात आलेल्या फोर्स कंपनीच्या प्रस्तावाचा विचार करावा आणि मगच पीएमपीएमएलच्या कोणत्याही प्रस्तावावर प्रक्रिया करा, असे पत्र महापौरांना भाजप अध्यक्षाकडून देण्यात आले होते.
दरम्यान, भाजप अध्यक्षाच्या या पत्रावर अरविंद शिंदे यांनी आणि राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-नाणार प्रकल्पावरून मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना आक्रमक!
-30 हजारांचा पिझ्झा खाणाऱ्या राहुल गांधींना 12 हजाराची नोकरी दिसत नाही!
-…तर मराठा समाजाला आरक्षण मिळेलच!
-मोदींचा जीव धोक्यात, मंत्र्यांनाही जवळ फिरकण्यास मनाई!
-भुजबळांवर पुन्हा टांगती तलवार; अडचणीत सापडण्याची चिन्हे!