शिष्यासाठी गुरुनं केला त्याग; भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचा ध्यास

चंदीगड | बजरंग पुनियाला मार्गदर्शन करण्यासाठी मी कुस्ती खेळणं बंद केलं, असं भारताचा आॅलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्तनं म्हटलं आहे. कुस्ती खेळणं सोडल्याचं दु:ख होत नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं.

2020 च्या टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेत बजरंग भारताला कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवून देईल, असा विश्वास देखील त्याने व्यक्त केला. बजरंगचा खेळ चांगला असल्यानं त्याची आॅलिम्पिकसाठी तयारी करुन घेत असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

बजरंंग आता 24 वर्षांचा असून त्याच्या कारकिर्दीवर माझ्यामुळे परिणाम होवू नये असं मला वाटलं. असं योगेश्वरनं सांगितलं.

दरम्यान, योगेश्वर खेळत असलेल्या 65 किलो वजनी गटातच बजरंग कुस्ती खेळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

– रामदास आठवलेंकडून शरद पवारांना उपपंतप्रधान पदाची आॅफर!

-एेश्वर्या रायला लालूच्या पोरानं पाठवली घटस्फोटाची नोटीस!

-क्रिकेटच्या मैदानात देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी!

-…नाहीतर पणन कार्यालय जाळून टाकू; बच्चू कडू यांचा इशारा!

-…म्हणून आजही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत आघाडीची चर्चा अडली!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या