नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असून भाजपचे अनेक बडे नेते दिल्लीत प्रचार करताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका प्रचारसभेत बोलताना अरविंद केजरीवाल यांच्यासोबत एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना लक्ष्य केलं आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमुळे आता अरविंद केजरीवाल हनुमान चालिसा म्हणत आहे. एक दिवस असा येईल की असदुद्दीन ओवैसीदेखील हनुमान चालिसा म्हणताना दिसतील, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
भाजपचे देशभरातील अनेत बडे नेते दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या सर्व नेत्यांकडून आप आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. शिवाय हे नेते घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार करताना दिसत आहेत.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर 11 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतं हे पाहावं लागेल.
ट्रेंडिंग बातम्या-
संजय बरा बोलतो, येतो का पक्षात; स्टेजवरच राज ठाकरेंची मित्राला खुली ऑफर!
NRC लागू होण्याच्या भीतीने 32 जणांचा जीव गेला- ममता बॅनर्जी
महत्वाच्या बातम्या-
पंतप्रधान मोदी एक दिवस ‘ताजमहल’ही विकतील; राहुल गांधींचं टीकास्त्र
स्वराज्यरक्षक संभाजी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अमोल कोल्हेंचा भावनिक व्हिडीओ
हतबल मुख्यमंत्र्यांनी राज्याची प्रतिमा खराब केली; भाजपची टीका
Comments are closed.