Yogi Adityanath | बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती. लाॅरेन्स बिश्नोईने बाबा सिद्धीकी यांची हत्या केल्याचं कबूल केलं. मुंबई पोलिसांनी हत्या करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतलं असून आरोपींची चौकशी सुरु आहे. त्यानंतर देखील बिश्नोई गँगने सलमान खानला धमकी देण्याचं काम सुरुच ठेवलंय. वातावरण शांत होत नाही तोच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बिशनोई गँगने धमकी दिली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना धमकी मिळाल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अज्ञात नंबरवरुन मेसेज आला असून, दहा दिवसात राजीनामा द्या नाही तर तुमचा बाबा सिद्दीकी करु असं म्हणत धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, हा मेसेज कोणी केला याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. आलेल्या धमकीमुळे योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
बाॅम्बने उडवण्याची धमकी-
योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना याआधी देखील धमकी देण्यात आली होती. मार्च महिन्यात लखनऊच्या महानगर येथे नियंत्रण कक्ष सुरक्षाच्या मुख्यालयात योगी आदित्यनाथ यांना बाॅम्बने उ़डणवण्याची धमकी देण्यात आलेली. यावेळी ड्यूटीवरील तैनात हेड काॅन्स्टेबल यांनी याबद्दलची माहिती दिली होती. रात्री 10 वाजायच्या आसपास त्यांना एका नंबरवरुन काॅल आला होता.
एका तरुणाने फोन करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. याशिवाय 2023 मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्रीराम मंदिर आणि उत्तर प्रदेश एसटीएफच्या प्रमुखांना बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी दिली होती. डीजीपी मुख्यालय आणि एसटीएफ मुख्यालयाच्या कंट्रोल रूममध्ये धमकीचा फोन आला होता.
दरम्यान, राज्यात विधानसभेच्या निवडणूका जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या सभांना सुरुवात झाली असून सगळीकडे प्रचार सुरु आहेत. भाजपच्या यादीत योगी आदित्यनाथ यांचं नाव आहे. त्यामुळे ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन पोलीस सतर्क झाले आहेत. त्यांनी या धमकीच्या संदेशाची चौकशी सुरू केली आहे.
News Title : Yogi Adityanath got call for death threat
महत्त्वाच्या बातम्या-
मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; ‘या’ मतदारसंघांमधून निवडणूक लढणार
‘अजित पवार मर्दाची औलाद असते तर…’; जितेंद्र आव्हाड भडकले
‘आमची विचारधारा सेम’; ‘या’ व्हिडीओमुळे पार्थ पवार होतायेत ट्रोल
भाऊबीजेला लाडक्या बहीणींसाठी गिफ्ट शोधताय?, मग ‘इथे’ मिळेल ट्रेंडी ऑप्शन
श्रीनिवास वनगा यांच्यानंतर शिंदे गटाचा आणखी एक नेता नॉट रिचेबल!