देवेंद्र फडणवीसांनंतर आता योगी आदित्यनाथ यांनीही दिला ‘मी पुन्हा येईन’चा नारा
लखनऊ | महाराष्ट्रात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’असा नारा दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रात चांगलंच सत्तानाट्य रंगलं होतं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केल्यामुळे फडणवीसांना परत सत्तेत येता आलं नाही. आता मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ‘मी पुन्हा येईन’, अशी घोषणा केली आहे.
उत्तर प्रदेशात सध्या अधिवेशन सुरु आहे. यावेळी योगी आदित्यनाथ बोलत होते. 2022 मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना गेल्या पाच वर्षात सरकारने केलेल्या कामाचा आढावा त्यांनी दिला. त्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या निवडणूकीत भाजप पुन्हा एकदा पुर्ण बहुमताने निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उत्तर प्रदेशातील प्रशासन, प्रशासनातील माणसे, महसूलाचा स्त्रोत या सर्व गोष्टी पूर्वी होत्या तशाच आहेत. आम्ही सत्तेत आले तेव्हा आम्ही फक्त कार्यपद्धतीत बदल केला. आणि हा बदल अमुलाग्र ठरला, असं म्हणत योगींनी विरोधकांना टोला लगावला.
दरम्यान, विरोधी पक्षनेते राम गेविंद चौधरी यांनी योगींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. तुमच्या नावात योगी आहे, मात्र अखिलेश यादव हे कर्मयोगी आहेत. त्यामुळे पुढील विधानसभेत उत्तर प्रदेश मध्ये योगी विरुद्ध कर्मयोगी असा सामना रंगेल आणि या लढाईत कर्मयोगी विजयी होतील, असं म्हणत राम गेविंद चौधरी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.
थोडक्यात बातम्या-
पोलिसाच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या; उस्मानाबादमध्ये घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरला!
‘या’ अधिकाऱ्याची अजब मागणी, म्हणाले…,’मला घोड्यावरून ऑफिसला यायचंय’
औरंगाबाद कोव्हिड सेंटरमध्ये झालेल्या प्रकाराची अजित पवारांकडून दखल; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
परदेशातील व्यक्तीलाही दिला सोनू सूदने मदतीचा हात; केलं ‘हे’ कौतुकास्पद काम
‘या जागी तुमची किंवा माझी बहीण असती तर?’; जळगाव वसतीगृहातील घटनेवरून मुनगंटीवार संतापले
Comments are closed.