भारतात रामाशिवाय कोणतंही काम पूर्ण होऊ शकत नाही!

अयोध्या | प्रभू रामचंद्रांशिवाय भारतात कोणतंही काम पूर्ण होऊ शकत नाही, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलंय. ते स्थानिक निवडणुकांच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. 

राम आमच्या आस्थेचं प्रतिक आहे तसेच ते संपूर्ण भारताच्या आस्थेचा केंद्रबिंदू असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, श्री श्री रविशंकर यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यावर राम मंदिरासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाचं आम्ही स्वागत करतो, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.