बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आपल्या घामाने महाराष्ट्र घडवणाऱ्या मजुरांचा ठाकरे सरकार छळ करतंय- योगी आदित्यनाथ

लखनऊ |  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मजुरांच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात मजुरांशी विश्वासघात करण्यात आला आहे. मजुरांना वाऱ्यावर सोडून देत त्यांना स्वगृही जाण्यास भाग पाडण्यात आलं आहे, अशा शब्दात आदित्यनाथ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राच्या विकासासाठी घाम गाणाऱ्या कामगारांचा शिवसेना आणि काँग्रेसच्या सरकारने नुसता छळ मांडला आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्याशी विश्वासघात करण्यात आला असून, त्यांना आहे त्याच अवस्थेवर ठेवण्यात आलं आहे. शिवाय त्यांना स्वगृही जाण्यासही भाग पाडण्यात येत आहे, असं ट्विट करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या अमानवी कृत्यासाठी मानवतेचं नातंही यासाठी तुम्हाला कधी माफ करणार नाही, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, भाजपशासित राज्यांमध्ये स्थलांतरित मजुरांशी अमानवी व्यवहार केला जात असल्याचा मुद्दा शिवसेनेकडून अधोरेखित करण्यात आला होता. त्यानंतर योगींनी ट्विट करून महाारष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंकर’; गुजरात सरकारला उच्च न्यायालयाने सुनावलं

31 मेनंतर लॉकडाऊन संपणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

ईदच्या निमित्ताने करूणा आणि बंधुता वाढावी; पंतप्रधान मोदींकडून ईदच्या शुभेच्छा

ही यादी घ्या, पण गाड्या योग्य स्टेशनवरच पोहचवा; राऊताचं रेल्वेमंत्र्यांना कडक प्रत्युत्तर

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More