बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मांस, दारू विक्रीबाबत मथुरेमध्ये आदित्यनाथांनी घेतला मोठा निर्णय!

लखनऊ | भारतामध्ये उत्तर प्रदेशला ‘देवभुमी’ म्हणुन ओळखले जाते. याठिकाणी अनेक महत्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. मथुरा ही श्री कृष्णाची जन्मभुमी असल्याचं मानलं जातं. त्यामुळे येथे श्री कृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशातच श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी श्री कृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला निमित्त मथुरा येथे मांस आणि दारूविक्रीवर बंदी घालत असल्याची घोषणा केली आहे. श्री कृष्ण जन्मोत्सवा निमित्त योगी आदित्यनाथ सोमवारी मथुरा येथे आले होते.

मथुरा येथील सात ठिकाणांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. त्यासोबतच अनेक दिवसांपासुन मथुरा येथे मांस विक्री आणि दारू बंदी व्हावी अशी नागरिकांची इच्छा होती. त्यामुळे येथे दारु बंदी आणि मांस विक्री बंद करण्यात आल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले.

दरम्यान, या व्यवसायाशी निगडित लोकांचं दुसऱ्या व्यवसायात पुर्नवसन करण्यात येईल. या लोकांना इतर व्यवसायाचं प्रशिक्षण देखील देण्यात येईल. मांस आणि दारू विक्री करणाऱ्या येथील व्यवसायिकांनी दुग्धव्यवसायाची छोटी दुकाने सुरू करावीतं असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मराठावाड्यात पावसाने पोलीस स्टेशनला बनवलं तलाव, पाहा व्हिडीओ

दरड कोसळतानाचा हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर येईल काटा, व्हिडीओ व्हायरल!

‘पत्नी मारते, आपटते, चावते, न्याय द्या नाहीतर…’; नवऱ्याने दिली बायकोचीच तक्रार!

“केवळ बडबड करून जनआशीर्वाद मिळत नाही, त्यासाठी कामं करावी लागतात”

‘तो फेरीवाला जेलमधून बाहेर येईल, त्याच दिवशी त्याला ठोकणार’; राज ठाकरे कडाडले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More