Top News

बॉलिवूड मुंबईतच राहणार, आम्ही काही घेऊन जायला आलो नाही- योगी आदित्यनाथ

मुंबई | आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय.

बॉलिवूडमधील दिग्गजांचा अनुभव घेऊन त्यांच्या सूचनेनुसार नवं मॉडल तयार करायचं आहे. वर्डक्लास फिल्मसिटी तयार करण्यासाठी फिल्मी दुनियेच्या लोकांशी चर्चा केली. आम्ही कुणाचं काही घेऊन जाणार नाही. आम्हाला नव निर्मिती करायची आहे. त्यासाठी आलो आहोत, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

कुणाची गुंतवणूक कुणी घेऊन जाणार नाही. कुणालाही बाधा आणायची नाही. भारताची इकनॉमी वाढवायची आहे. मला वाटतं हेच सर्वांचंही लक्ष असलं पाहिजे, असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय.

कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही. ही काय पर्स आहे का? की ती कुणीही घेऊन निघून जाईल. ही खुली स्पर्धा आहे. सुरक्षा देण्याची, सामाजिक सुरक्षा देण्याची, कुणासोबत भेदभाव न करता चांगलं वातावरण देण्याची गरज आहे. ती प्रत्येकाने दिली पाहिजे, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

मुंबईत बॉलिवूडचं वास्तव्य, सोयी-सुविधा असताना उत्तरप्रदेशात कोण जाईल?- अशोक चव्हाण

“ठाकरे सरकारच्या अकलेचं दिवाळं निघाल्याचं हे आणखी एक उदाहरण”

‘बेईमान आणि गद्दारी म्हणजे राणे’; शिवसेनेचं राणेंना चोख प्रत्युत्तर

शेतकरी आंदोलनातील बरेच जण शेतकरी वाटत नाहीत; केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त विधान

शीतल आमटेंच्या सासू-सासऱ्यांचे आमटे कुटुंबावर धक्कादायक आरोप

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या