Top News

उत्तर प्रदेश सरकार उभारणार सर्वात मोठी फिल्मसिटी; योगी आदित्यनाथ यांनी केली घोषणा

लखनऊ | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे विविध जिल्ह्यांमधील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली आहे.

देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज आहे. आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार आहोत, असं  योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केल. त्यांच्या या घोषणेनंतर अनेक कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे.

देशाला एका चांगल्या फिल्म सीटीची गरज आहे. उत्तर प्रदेश ही जबाबदारी घेण्यास तयार आहे. आम्ही येथे एक भव्य फिल्म सिटीची उभारणी करु. फिल्मसिटीसाठी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेसवेचे क्षेत्र चांगले ठरेल. ही फिल्मसीटी चित्रपट निर्मात्यांना चांगली संधी मिळवून देणार आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.

त्यांच्या या निर्णयाचे अनेक कलाकारांनी स्वागत केले. अभिनेत्री कंगाना रणौत, कॉमेडियन राजू श्रीवास्तव, गायक अनुप जलोटा यांनी ट्विट करत योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

IPL2020- जॉर्डनची शेवटी ओव्हर पडली महागात, ‘या’ विक्रमात जोडलं नाव

IPL2020- सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात अवघ्या 3 धावांनी दिल्लीची पंजाबवर मात

“उद्धवजी…तुमची प्रतिमा कशीही असो, किमान महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होणार नाही ही काळजी घ्या

राज्यसभेतील गोंधळ दुर्देवी आणि लज्जास्पद- राजनाथ सिंग

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोनावर मात!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या